तुकाराम मुंडेंच्या कारवाईमुळं श्रेयस तळपदे सतर्क, घेतला हा मोठा निर्णय

Published : Jul 15, 2026, 04:26 PM IST
tukaram munde

सार

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक मोहिमेमुळे अभिनेता श्रेयस तळपदेने एक मोठा निर्णय घेतला आहे. भेसळीचे व्हिडीओ पाहून, पूर्वी आठवड्यातून सात वेळा पनीर खाणाऱ्या श्रेयसने आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी केला आहे.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे हे सध्या चर्चेत आले आहेत. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. आता अन्नपदार्थांमधील भेसळ हा विषय सर्वसामान्यांसाठी टेन्शनचा झाला आहे. भेसळीचे व्हिडीओ पुढं आल्यानंतर हॉटेल मालक कारवाईच्या भीतीने घाबरून गेले आहेत.

श्रेयस तळपदेने घेतला निर्णय 

अभिनेता श्रेयस तळपदे याने तुकाराम मुंडे यांचे व्हिडीओ पाहून एक निर्णय घेतला आहे. त्यानं सोशल मीडियावर भेसळीचे व्हिडीओ पाहिले. त्यानंतर त्या व्हिडिओंमधील काही व्हिडीओ खरे असतात याबद्दल त्याची खात्री पटली आहे. तुकाराम मुंडे यांनी धडक मोहीम हाती घेतली असून त्यामधून आपल्याला भेसळीबाबतचे व्हिडीओ समोर येताना दिसत आहेत.

आधी आठवड्यात ७ वेळा पनीर खाल्लं जायचं 

आधी आठवड्यात ७ वेळा आमच्या घरी पनीर खाल्लं जायचं. पण आता आम्ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी केला आहे. श्रेयस दररोज रात्री झोपताना हळदीचं दूध प्यायचा. आता त्यानं ते बंद केलं आहे. चहा कोरा किंवा ब्लॅक कॉफी पितो. अगदीच फारच पनीर खायची इच्छा झाली तर खात्रीशीर ठिकाणावरून पनीर आणलं जात अस त्यानं सांगितलं आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Drought : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; मदतीसाठी सरकारची तयारी सुरू
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका