शिवराज दिवटेला मारहाण झाल्याप्रकरणी बीड बंदची हाक स्थगित पण परळीत होणार आंदोलन

Published : May 19, 2025, 12:21 PM ISTUpdated : May 19, 2025, 12:44 PM IST
Parli Andolan

सार

परळीमधील टोकवाडी येथे लिंबोटामध्ये राहणाऱ्या शिवराज दिवटे मारहाण प्रकरण सध्या तापले आहे. यामुळे बीड बंदची हाक देण्यात आली होती. पण रविवारी रात्री बंदची हाक स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. 

Shivraj Divate Assault Case : परळीमधील शिवराज दिवटे या तरुणाला किरकोळ कारणावस्तून जवळजवळ 14 जणांनी बेदम मारहाण केले. सदर घटना शुक्रवारी दुपारी परळीजवळ असणाऱ्या रत्नेश्वर मंदिराच्या आवारातील जंगल्यात घडल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय शिवराजला मारहाण केल्यानंतर त्याचे व्हिडीओ देखील तयार करण्यात आले. सध्या शिवराज गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व प्रकरणामुळे बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. पण रविवारी मध्यरात्री बीड बंदची हाक स्थगित केली गेली. मात्र, परळीमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवराज दिवटे याला मारहाण झाल्याने मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस संतप्त झाले आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय धस आणि जरांगे पाटील यांनी दिवटे याची भेट घेतली.

सदर घटनेमध्ये परळी पोलीस स्थानकात 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील सचिन मुंडे, सामाधान मुंडे, रोहण वाघुळकर, आदित्य गित्ते, तुकाराम याच्यासह दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींपैकी पाच जणांचा पोलीस कोठडी सुनावली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!