Shirdi Sai Baba : नवं वर्षाची सुरुवात सकारात्मक होण्यासाठी अनेक भाविक शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी जातात. यंदाच्या वर्षातील पहिल्याच दिवसाचे साईबाबांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शिर्डी साईबाबांचा हा मनोहारी फोटो भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र ठरतो आहे. सुवर्ण सिंहासनावर विराजमान असलेल्या साईबाबांच्या मुखावरची शांतता आणि करुणा मनाला समाधान देणारी आहे. नववर्षाच्या सुरुवातीला साईदर्शनाने भक्तांना सकारात्मक ऊर्जेचा अनुभव मिळतो.
25
नवं वर्षात घ्या साईंचे दर्शन
साईबाबांच्या पाठीमागे कोरलेली ‘श्रद्धा’ आणि ‘सबुरी’ ही दोन शब्दांची शिकवण भक्तांना जीवनात संयम आणि विश्वास ठेवण्याची प्रेरणा देते. या दर्शनातून साईबाबांचा आध्यात्मिक संदेश अधिक ठळकपणे जाणवतो.
35
खास सजावट
फुलांच्या आकर्षक सजावटीत साईबाबांचं दर्शन अधिकच लोभसवाणं झालं आहे. रंगीबेरंगी हार, पुष्परचना आणि दागिन्यांनी साईमूर्ती सजवण्यात आली असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे.
शिर्डीतील हे साईदर्शन केवळ धार्मिकच नाही तर मानसिक शांतता देणारं आहे. नव्या वर्षाची सुरुवात साईबाबांच्या आशीर्वादाने केल्याने भाविकांमध्ये नवचैतन्य आणि आशावाद संचारताना दिसत आहे.
55
साईनगरी दुमदुमली
प्रत्येक वर्षी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. आज नवं वर्षाच्या सुरुवातीला देखील भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.