प्रवाशांनो लक्ष द्या! छत्रपती संभाजीनगरहून धावणाऱ्या रेल्वेच्या वेळा बदलल्या; १ जानेवारीपासून 'हे' असेल नवे वेळापत्रक

Published : Dec 31, 2025, 05:44 PM IST

Chhatrapati Sambhajinagar Train Time Change : दक्षिण मध्य रेल्वेने १ जानेवारी २०२६ पासून छत्रपती संभाजीनगरहून धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले. यामध्ये वंदे भारत, जनशताब्दी आणि सचखंड एक्सप्रेससारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे

PREV
14
प्रवाशांनो लक्ष द्या! छत्रपती संभाजीनगरहून धावणाऱ्या रेल्वेच्या वेळा बदलल्या

छत्रपती संभाजीनगर : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने १ जानेवारी २०२६ पासून आपल्या गाड्यांच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वंदे भारत, जनशताब्दी आणि सचखंड यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश असून, अनेक गाड्यांच्या वेळेत ५ ते १५ मिनिटांचा फरक पडला आहे. 

24
प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासणे अनिवार्य

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, १ जानेवारी किंवा त्यानंतरचे आरक्षण असलेल्या प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची वेळ निश्चित तपासावी. वेळेतील या बदलांमुळे प्रवाशांची धावपळ होऊ नये, यासाठी रेल्वेने अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली आहे. 

34
छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील सुधारित वेळा (१ जानेवारीपासून लागू)

खालील तक्त्यात गाड्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेत झालेले बदल दिले आहेत.

रेल्वेचे नाव जुनी वेळ (येणे/जाणे) नवीन वेळ (येणे/जाणे)

हिंगोली - मुंबई जनशताब्दी स. ९:३० / ९:३४ स. ९:३५ / ९:४०

मुंबई - नांदेड वंदे भारत संध्या. ६:४८ / ६:५० संध्या. ६:५३ / ६:५५

अमृतसर - नांदेड सचखंड स. ९:४० / ९:४५ स. १०:०० / १०:०५

काचीगुडा - मनमाड अजिंठा पहाटे ४:४० / ४:४५ पहाटे ५:२५ / ५:३०

मराठवाडा संपर्क क्रांती संध्या. ६:५५ / ७:०० संध्या. ७:१५ / ७:२०

हिसार - हैदराबाद एक्सप्रेस संध्या. ६:५५ / ७:०० संध्या. ७:१५ / ७:२०

दौंड - निजामाबाद एक्सप्रेस रात्री १२:४५ / १२:५० रात्री १:०५ / १:१०

निजामाबाद - पुणे एक्सप्रेस स. ८:२० / ८:२५ स. ८:२४ / ८:३०

नरसापूर - नगरसोल SF पहाटे ४:३० / ४:३५ पहाटे ४:५० / ४:५५

धर्माबाद - मनमाड मराठवाडा स. ९:४५ / ९:५० स. ९:५० / ९:५५

चेन्नई / रामेश्वरम - ओखा स. ९:५५ / १०:०० स. १०:०५ / १०:१०

नगरसोल - जालना DEMU संध्या. ७:४३ / ७:४५ संध्या. ७:५३ / ७:५५ 

44
येथे मिळेल खात्रीशीर माहिती

प्रवाशांनी अद्ययावत माहितीसाठी भारतीय रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ, 'नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम' (NTES) ॲप किंवा स्टेशनवरील चौकशी कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केले आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories