Pune Crime : हडपसर येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मुलाचा हवेत गोळीबार, मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार

Published : May 30, 2025, 09:38 AM ISTUpdated : May 30, 2025, 11:10 AM IST
firing

सार

हडपसर येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मुलाचा हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

Pune : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर येथील कॅनल रोड परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मुलाने मस्तीखोरपणे हवेत गोळीबार केला. मात्र, ही मस्ती जीवावर बेतली, कारण गोळीबाराच्या वेळी गोळी त्याच्या मावस भावाच्या खांद्यातून आरपार गेली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं? 
२९ मे २०२५ रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील सातववाडी कॅनल रोड येथे ही घटना घडली. वाढदिवसाच्या निमित्ताने काही तरुण दुचाकीवरून निघाले होते. यावेळी सुमित खवळे नावाच्या तरुणाने आपल्या जवळील गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. मात्र, गोळी चुकून गाडीवर बसलेल्या त्याच्या मावस भाऊ वैभव गवळी (वय २०) याच्या डाव्या खांद्यात लागली.

गोळी लागल्यानंतर वैभव गवळी याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर परिस्थिती लक्षात घेऊन त्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आलं. ससून रुग्णालयातून मुंढवा पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.गोळीबार करणारा तरुण शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा मुलगा आहे. त्याच्याकडे गावठी कट्टा अवैधरीत्या होता. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिंदे गटाच्या युवा शहराध्यक्ष नीलेश घारे याने स्वतःवर गोळीबार झाल्याचा बनाव केला होता. त्याने पोलिसांना वारजे माळवाडी परिसरात त्याच्या गाडीवर गोळीबार झाला असल्याची माहिती दिली होती.पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या बनावामागे सचिन गोळे, शुभम खैरनार आणि अजय सपकाळ हे त्याचेच जवळचे लोक असल्याचे उघड झाले. पोलिसांनी नीलेश घारे याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

रत्नागिरीची वेदा ठरतेय इंटरनेट सेन्सेशन, वय 1 वर्ष 9 महिने, 100 मीटर पोहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डममध्ये विक्रमाची नोंद!
मोठी बातमी! शेतकरी कुटुंबाला मिळतील 'एवढे' लाख रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती!