Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, सात जण जखमी

Published : Jun 19, 2025, 12:07 PM ISTUpdated : Jun 19, 2025, 12:26 PM IST
Samruddhi Mahamarg

सार

Shahapur Accident : समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना 19 जूनला पहाटेच्या वेळेस घडल्याचे सांगण्यात आले आहे. 

Shahapur : नुकत्याच लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गाच्या टप्प्यावर शहापूर येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. कोळकेवाडी आणि आमने टोलनाका दरम्यान शहापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाशिंद पोलीस हद्दीत आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. या अपघातात क्रुझर जीप आणि ट्रकचा समावेश असून वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अब्दुल पाशा शेख (वय 65) आणि जाहीद सिद्दिकी (वय 40) अशी असून, जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त फोर्स जीप (MH 22 AW 5360) ही परभणीहून भिवंडी येथे नातेवाईकांकडे येत होती. चालक माऊली गुंजाळ पाथरीहून निघाले होते आणि पावसामुळे आणि झोपेमुळे चॅनल नंबर 690 वर त्यांना समोरील ट्रक (MH-48 CB-3953) दिसला नाही. परिणामी भरधाव वेगात त्यांनी ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतरही ट्रक न थांबता पुढे गेल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच वाशिंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, अपघातामागील नेमकी कारणमीमांसा केली जात आहे. समृद्धी महामार्गावर सुरू असलेल्या अपघातांच्या घटनांमुळे पुन्हा एकदा सुरक्षा उपायांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या

गेल्या दोन वर्षांत समृद्धी महामार्गावर तब्बल 140 अपघात झाले असून यात 233 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर फक्त 2025 च्या पहिल्या तिमाहीत 45 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर