
Satara Accident : सातारा-सज्जनगड रस्त्यावर डेबवाडीजव दुचाकी आणि पिअकप गाडीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरिन दोघांचा मृत्यू झाला. तर तिसरा जखमी झाला आहे. वेदांत शिंदे आणि प्रज्वल किर्दत अशी मृत मुलांच नावे आहेत. सदर प्रकरणात पिकअप चालकावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
नक्की काय घडले?
अपघाताच्या घटनेची माहिती देत पोलिसांनी म्हटले की, सातारा येथील सज्जनगड-सातारा रस्त्यावर सज्जनगड येथून डबेवाडीच्या दिशेने दुचाकीवरुन ट्रिपल सीट येत असताना अपघात घडला. यावेळी पिकअप गाडीची दुचाकीला जोरात धडक बसली असता अपघात घडला. या अपघातात दोनजणांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही 14-15 वयोगटातील आहेत. तर जखमी झालेल्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खरंतर, नुकतीच परीक्षा संपल्याच्या आनंदात वडापाव खाण्यासाठी गावापासून 5 किलोमीटर अंतरावर दोघेजण गेले होते. पण घरी परतताना त्यांचा अपघात झाला. असे सांगितले जातेय की, घरी येण्यासाठी त्यांनी एका दुचाकी चालकाची मदत घेतली होती.