
पुणे : पुणेतील प्रतिष्ठित ससून सर्वोपचार रुग्णालयात गट-ड संवर्गातील एकूण 354 पदांची भरती जाहीर झाली आहे. ही भरती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली राबवण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
संस्था: ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
एकूण पदसंख्या: 354
संवर्ग: गट-ड (वर्ग 4)
अर्ज प्रक्रिया: पूर्णपणे ऑनलाईन
अधिकृत वेबसाइट: https://bjgmcpune.com
पदाचे नाव पदसंख्या
कक्षसेवक 168
आया 38
चतुर्थ श्रेणी सेवक 36
पहारेकरी 23
क्ष-किरण सेवक 15
रुग्णपट वाहक 10
हमाल 13
सहाय्यक स्वयंपाकी 9
नाभिक 8
स्वयंपाकी सेवक 8
प्रयोगशाळा सेवक 8
माळी 3
बटलर 4
संदेश वाहक 2
दवाखाना सेवक 4
प्रयोगशाळा परिचर 1
भंडार सेवक 1
गॅस प्लांट ऑपरेटर 1
शिपाई 2
अर्ज सुरू होण्याची तारीख: 15 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 ऑगस्ट 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 31 ऑगस्ट 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत
अधिकृत वेबसाइट https://bjgmcpune.com ला भेट द्या
भरती संबंधित लिंकवर क्लिक करा
सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा
अर्ज सबमिट करून त्याचा प्रिंटआउट जतन करा
परीक्षा संबंधित तारीख व वेळ उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे जाहीर केली जाईल
पदसंख्या, आरक्षण, अटी व शर्ती यामध्ये बदल करण्याचा अधिकार ससून रुग्णालय प्रशासनाकडे असणार आहे
भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित किंवा रद्द केली जाऊ शकते
जर तुम्ही शासकीय आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर ससून हॉस्पिटल, पुणे मधील ही भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. वेळेवर अर्ज करा आणि संधीचे सोनं करा!