
Uddhav Thackeray and Raj Thackeray Reunion : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार का अशा चर्चा अलीकडल्या काळात जोरदार सुरू झाल्या. यामुळे राजकरण तापले गेल्याचे चित्र होते. पण यानंतर या चर्चांना पूर्णविराम लागला गेला आणि दोन्ही ठाकरे बंधू युरोप टूरवर गेले. दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या एका विधानाने पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
संजय राऊत यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनीच एकत्रित येण्याबद्दल भाष्य केले तर आता काय झाले? या विधानावरुन पुन्हा राज्यात ठाकरे बंधूंच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
संजय राऊत यांनी नक्की काय म्हटले?
उद्धव ठाकरे जुने वाद विसरुन एकत्रित येण्यास सहमत आहेत. पण राज ठाकरे आता वेट अँड वॉचची भूमिकेत का आहेत? यावर संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनीच युतीबद्दल सुरुवात केली होती. यामुळे त्यांनी एकत्रित येण्याबद्दल याची सुरुवात करावी. उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीसाठी सकारात्मक प्रतिक्रिया आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी काही मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबत एकत्रित येण्यावर इच्छा व्यक्त केली होती. पण आता यावरच राज यांनी मौन बाळगले आहे. अशातच राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार का? यावरुन वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्यावरुन झालेल्या चर्चा
संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर सोडला निर्णय
सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीबाबतचा चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात टाकला आहे. ते म्हणाले की राज ठाकरे यांनी युतीची चर्चा यापूर्वीच सुरू केली होती आणि म्हणूनच ते पुन्हा सुरू करतील. आम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की आम्ही युतीबद्दल सकारात्मक आहोत.
मनसे नेत्यांकडून राज ठाकरेंच्या निर्णयाची वाट
तथापि, जेव्हा आम्ही मनसे नेत्यांना विचारले की युतीबाबत सुरू असलेल्या या चर्चेत पुढे काय होईल? तर त्यांनी उत्तर दिले की राज ठाकरे सर्व निर्णय योग्य वेळी घेतील. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत आज पुन्हा राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. अशा परिस्थितीत आता उद्धव यांची शिवसेना नाही तर एकनाथांची शिवसेना राज ठाकरेंसोबत युती करू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे.