बुलढाणा येथे भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, चार जखमींवर उपचार सुरु

Published : May 13, 2025, 11:31 AM ISTUpdated : May 17, 2025, 04:10 PM IST
buldhana accident

सार

बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

बुलढाणा येथे नांदुर शहरात मंगळवारी (13 मे) पहाटे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अपघातातील चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील राष्ट्रीय महामार्गावर सदर अपघात घडल्याची माहिती आहे. पहाटे 4.30 वाजता अपघात घडला. नांदुर शहराजवळ कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक बसली असता अपघात घडला. यावेळी तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

अपघातानंतर कारचे बोनेट पूर्णपणे चेपले गेल्याने आतमधील मृतदेह काढण्यास त्रास होत होता. यानंतर कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. याशिवाय जमखींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आबे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर