रोहिणी खडसे यांनी पकडला हातात साप, नेमकं काय होतं कारण?

vivek panmand   | CMS
Published : Aug 12, 2026, 05:39 PM IST
rohini khadse

सार

धामण हा एक बिनविषारी साप असून तो शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो, कारण तो पिकांची नासाडी करणाऱ्या उंदरांना खातो. अनेकदा लोक त्याला नाग समजून मारतात, म्हणूनच रोहिणी खडसे यांनी एका व्हिडिओद्वारे या सापाला न मारण्याचे आणि त्याच्या फायद्यांविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.

शेतीच्या परिसरात धामण जातीचा साप निघत असतो. त्याला अनेकदा शेतकऱ्यांचा मित्र असं म्हटलं जातं. पण अनेकदा त्याला नाग समजून लोकांकडून मारलं जात. याबाबत आता नेत्या रोहिणी खडसे यांनी एक व्हिडीओ बनवून पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी या सापाचा शेतकऱ्याला कसा फायदा होतो याबद्दल सांगितलं आहे.

धामण हा बिनविषारी साप 

धामण हा साप शेतकऱ्यांचा मित्र असून तो बिनविषारी असतो. त्याच्या अंगावर तापकीरी, काळा, पिवळसर आणि हिरवट अशा रंगाच्या छटा दिसून येतात. त्याच्या शेपटीच्या बाजूकडून तो जाळीदार नक्षीदार दिसतो. अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात या धामणीचा मोठा हात असतो. त्यामुळं तिला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जात.

धामण उंदरांची करते शिकार 

धामण हा प्राणी चपळ असल्यामुळं तो उंदरांची शिकार करतो. नाग आणि धामण सारखेच दिसत असल्यामुळं त्याला अनेकदा शेतकऱ्यांकडून मारलं जात. या सापाला गैरसमजातून मारू नये असं यावेळी रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. त्यांनी यावेळी पकडलेल्या सापाला जंगलात सोडून दिलं. त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Pune Crime : निगडीत मंदिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मेट्रो कामगार अटकेत
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर