सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

एशियानेट न्यूज पोर्टलवर १६ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

vivek panmand | Published : Sep 16, 2024 2:58 AM IST / Updated: Sep 16 2024, 09:07 PM IST

१. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.

२. शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा. ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्यानं राहुल गांधींवर बोलूच नये. अंथरूण बघून पाय पसरावे म्हणतात ना, तसं गायकवाडनं आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

३. सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला इशारा दिला आहे.आज मध्यरात्रीपासून ते उपोषणाला बसणार आहेत.

४. स्ट्राईक रेट आणि निवडून येण्याची क्षमता पाहूनच तिकीट दिले जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूका घेतल्या जातील असं भाकीत वर्तवलं आहे. 

५. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंतामणी आणि लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं आहे. 

६. आमचं सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करू असं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. 

७. धनगर आरक्षणासाठी नवीन समितीच स्थापन करण्यात आली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 

Share this article