
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकांबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. ते महायुती सरकारसोबत सरकारमध्ये येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही. राज ठाकरे यांनी म्हटलंय की, 2024 चा मुख्यमंत्री भाजपचाच होईल. तर 2029 चा मुख्यमंत्री हा मनसेचा होईल. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे यांनी काय सांगितलं?
राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, मनसेनं 100 पेक्षा अधिक जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे मनसेच्या किती जागा येतात याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागून आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र व्हिजन या कार्यक्रमात बोलताना यंदा 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे मोठं वक्तव्य केले आहे.
भाजपाबद्दल काय विधान केलं? -
अमित विरोधात उमेदवार देणे हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग आहे. प्रत्येकजण स्वभावानुसार वागतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते पण सगळ्यांनाच हे कळेल असे नाही. इतरांचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.