
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वेने 2025 च्या गणपती उत्सवासाठी 11 विशेष रेल्वे गाड्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, भांडुप, पुणे येथून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी या 125 फेऱ्या उपलब्ध असतील. या विशेष गाड्या 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2025 या कालावधीत धावणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सर्व गाड्यांसाठीचं बुकिंग 25 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे.
येथे प्रत्येक विशेष ट्रेनचे तपशीलवार वेळापत्रक, थांबे आणि डब्यांची माहिती दिली आहे.
गाडी क्र. 01151 (CSMT ते सावंतवाडी रोड): दररोज 00:20 वाजता सुटेल आणि 14:20 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01152 (सावंतवाडी रोड ते CSMT): दररोज 15:35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04:35 वाजता पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
रचना: 22 डबे (02 AC 3 टियर, 12 स्लीपर, 06 जनरल, 02 SLR).
गाडी क्र. 01171 (LTT ते सावंतवाडी रोड): दररोज 08:20 वाजता सुटेल आणि 21:00 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01172 (सावंतवाडी रोड ते LTT): दररोज 22:35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10:40 वाजता पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
रचना: 22 डबे (02 AC 3 टियर, 12 स्लीपर, 06 जनरल, 02 SLR).
गाडी क्र. 01153 (CSMT ते रत्नागिरी): दररोज 11:30 वाजता सुटेल आणि 20:10 वाजता रत्नागिरीला पोहोचेल (22/08/2025 ते 08/09/2025).
गाडी क्र. 01154 (रत्नागिरी ते CSMT): दररोज 04:00 वाजता सुटेल आणि 13:30 वाजता CSMT ला पोहोचेल (23/08/2025 ते 09/09/2025).
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
रचना: 22 डबे (02 AC 3 टियर, 12 स्लीपर, 06 जनरल, 02 SLR).
गाडी क्र. 01103 (CSMT ते सावंतवाडी रोड): दररोज 15:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04:00 वाजता पोहोचेल (22/08/2025 ते 08/09/2025).
गाडी क्र. 01104 (सावंतवाडी रोड ते CSMT): दररोज 04:35 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 16:40 वाजता पोहोचेल (23/08/2025 ते 09/09/2025).
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
रचना: 22 डबे (02 AC 3 टियर, 12 स्लीपर, 06 जनरल, 02 SLR).
गाडी क्र. 01167 (LTT ते सावंतवाडी रोड): दररोज 21:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 09:20 वाजता पोहोचेल (22/08/2025 ते 08/09/2025).
गाडी क्र. 01168 (सावंतवाडी रोड ते LTT): दररोज 11:35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 00:40 वाजता पोहोचेल (23/08/2025 ते 09/09/2025).
थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
रचना: 22 डबे (02 AC 3 टियर, 12 स्लीपर, 06 जनरल, 02 SLR).
गाडी क्र. 01155 (दिवा जं. ते चिपळूण): दररोज 07:15 वाजता सुटेल आणि 14:00 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01156 (चिपळूण ते दिवा जं.): दररोज 15:30 वाजता सुटेल आणि 22:50 वाजता पोहोचेल.
थांबे: निलजे, तळोजा पंचनंद, काळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिथे, हमारापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवणखवटी, काळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.
रचना: 08 मेमू डबे.
गाडी क्र. 01165 (LTT ते मडगाव जं.): 00:45 वाजता सुटेल आणि 14:30 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01166 (मडगाव जं. ते LTT): 16:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04:50 वाजता पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, माडुरे, थिवीम आणि कार्मली.
रचना: 21 LHB डबे (01 फर्स्ट AC, 03 AC 2 टियर, 15 AC 3 टियर, 02 जनरेटर कार).
गाडी क्र. 01185 (LTT ते मडगाव जं.): 00:45 वाजता सुटेल आणि 14:30 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01186 (मडगाव जं. ते LTT): 16:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04:50 वाजता पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, माडुरे, थिवीम आणि कार्मली.
रचना: 21 LHB डबे (01 फर्स्ट AC, 01 AC 2 टियर, 05 AC 3 टियर, 08 स्लीपर, 04 जनरल, 01 SLR, 01 जनरेटर कार).
गाडी क्र. 01129 (LTT ते सावंतवाडी रोड): 08:45 वाजता सुटेल आणि 22:20 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01130 (सावंतवाडी रोड ते LTT): 23:20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:45 वाजता पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
रचना: 22 डबे (02 AC 3 टियर, 12 स्लीपर, 06 जनरल, 02 SLR).
गाडी क्र. 01445 (पुणे जं. ते रत्नागिरी): 00:25 वाजता सुटेल आणि 11:50 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01446 (रत्नागिरी ते पुणे जं.): 17:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05:00 वाजता पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
रचना: 20 LHB डबे (03 AC 2 टियर, 15 AC 3 टियर, 01 SLR, 01 जनरेटर कार).
गाडी क्र. 01447 (पुणे जं. ते रत्नागिरी): 00:25 वाजता सुटेल आणि 11:50 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01448 (रत्नागिरी ते पुणे जं.): 17:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05:00 वाजता पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
रचना: 22 LHB डबे (01 AC 2 टियर, 04 AC 3 टियर, 11 स्लीपर, 04 जनरल, 02 SLR).
बुकिंग कधीपासून सुरू?
सर्व गणपती विशेष गाड्यांसाठीचे बुकिंग 25 जुलै 2025 पासून सुरू होईल.
ऑनलाइन बुकिंग कुठे कराल?
रेल्वेच्या www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवरून किंवा Amazon, Bookmytrip सारख्या इतर ऑनलाइन बुकिंग पोर्टल्सवरून तुम्ही तिकीट बुक करू शकता.
प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा www.konkanrailway.com या वेबसाइट्सला भेट द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचा विचार करत असाल, तर वेळेत आपले तिकीट आरक्षित करून घ्या आणि प्रवासाची चिंता विसरा!