कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होणार पाऊस, या ठिकाणी राहणार पावसाची उघडीप

Published : Jul 23, 2026, 05:54 PM IST
mumbai heavy rain high tide alert waterlogging panvel slab collapse maharashtra monsoon 2026

सार

राज्यात पावसाला सुरुवात झाली असून कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, मुंबई, रायगड, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. आता उन्हाच्या झळा कमी झाल्या असून वारे वाहायला लागले आहेत. आज राज्यात पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र उरलेल्या राज्यात पावसाची उघडीप राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ऑरेंज अलर्ट कुठं केला जारी? 

पुणे, नाशिक, कोकण आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, नाशिक, मुंबई, रायगड, रत्नागिरी काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी उघडीप राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

येलो अलर्ट केला जारी? 

सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर धुळे, नंदुरबार,जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nashik Flood : नाशिकमध्ये पावसाचं थैमान, गोदावरीच्या पुरात मंदिरं पाण्याखाली; पाहा PHOTOS
Maharashtra Rain : महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा