पुण्यात प्रफुल लोढावर आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा! बावधन पोलीस ठाण्यात FIR दाखल, पोलिसांच्या गुप्ततेवर प्रश्नचिन्ह

Published : Jul 22, 2025, 11:20 AM IST
Praful Lodha

सार

हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या प्रफुल लोढाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. यामुळे लोढाच्या विरोधात पुण्यातील बावधन पोलीस स्थानकात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : सध्या महाराष्ट्रात हनी ट्रॅप प्रकरणाची प्रचंड चर्चा सुरू आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रफुल लोढा याच्यावर आधीच दोन गंभीर गुन्हे दाखल झाले असून, आता त्याच्यावर पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे लोढाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२५ रोजी पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात प्रफुल लोढा याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळल्याने त्यांच्या भूमिकेबाबत सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पीडित महिलेचा गंभीर आरोप

कोथरूड येथे राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. तिच्या पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, "प्रफुल लोढाने तिच्या पतीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले आणि २७ मे २०२५ रोजी बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केले." पीडितेच्या म्हणण्यानुसार, लोढाने तिला नोकरी घालवण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला

या प्रकरणावर कारवाई करत बावधन पोलिसांनी लोढाविरोधात लैंगिक अत्याचार (कलम ३७६) आणि धमकी (कलम ५०६) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रफुल लोढा सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे, कारण त्याच्यावर हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आधीच गुन्हे दाखल आहेत. लवकरच पिंपरी-चिंचवड पोलिस मुंबई पोलिसांकडून लोढाचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर संशय

या नव्या प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुन्हा १७ जुलै रोजी दाखल झाला असतानाही पोलिसांनी याची अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे बावधन पोलिसांच्या गुप्ततेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी इतक्या दिवसांत प्रकरण गुप्त ठेवले यामागे कोणते हेतू आहेत, याबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे.

आधीचा गुन्हा

सुरुवातीला मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात "हनी ट्रॅप" आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात त्याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसह तिच्या मैत्रिणीवर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केला. इतकेच नाही तर त्याने दोघींचे अश्लील फोटो काढले, त्यांना बंद खोलीत डांबून ठेवले आणि धमकावले, असे पीडित मुलींच्या तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे प्रफुल लोढावर "पॉक्सो" कायदा, लैंगिक शोषण आणि धमकी यासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट