Pune Mayor : मंजुषा नागपुरे यांची पुण्याच्या महापौरपदी निवड, जाणून घ्या त्यांच्याबद्दल A to Z माहिती

Published : Feb 03, 2026, 02:13 PM ISTUpdated : Feb 03, 2026, 03:07 PM IST
Pune Mayor

सार

Pune Mayor : पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार असून, सिंहगड रोडला प्रथमच महापौरपदाचा मान मिळाला आहे.

Pune Mayor : पुणे महापालिकेच्या (PMC Mayor) महापौरपदासाठी भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेनुसार ही निवडणूक मैत्रीपूर्ण पद्धतीने होणार असल्याने, राष्ट्रवादीकडून उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुण्याला नवी महिला महापौर मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भाजपकडून मंजुषा नागपुरेंच्या नावाची अधिकृत घोषणा

आज भाजपकडून पुण्याच्या महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बैठकीत ही घोषणा केली.

सिंहगड रोडला प्रथमच महापौरपदाचा मान

मंजुषा नागपुरे या सिंहगड रोड परिसरातून सलग तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदाही त्या बिनविरोध निवडून आल्या असून, सिंहगड रोड भागाला प्रथमच महापौरपदाचा मान मिळाला आहे.

आनंदोत्सव टाळण्याचे भाजपचे निर्देश

अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संयम पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर व उपमहापौर निवडीनंतर फटाके, गुलाल किंवा बॅनर लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना भाजपच्या सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. या सूचना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिल्या आहेत.

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे तब्बल 119 नगरसेवक निवडून आले आहेत. महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव असून, भाजपने मोठ्या प्रमाणात महिला उमेदवारांना संधी दिली होती. यामधून 50 हून अधिक महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत.

महापौर-उपमहापौर निवड बिनविरोधच; राष्ट्रवादीचा शब्द कायम

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार होती. अजित पवारांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीकडून पाळण्यात येणार असल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

मंजुषा नागपुरे या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ज्येष्ठ नेत्या असून ३ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांची पुण्याच्या महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्याबद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे:

राजकीय कारकीर्द

त्या सलग तीन वेळा पुणे महानगरपालिकेवर निवडून आल्या आहेत (२०१२, २०१७, २०२६). २०२६ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. ३५ (सनसिटी-माणिकबाग, सिंहगड रोड) मधून त्या बिनविरोध निवडून आल्या. सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान त्यांच्या रूपाने मिळत आहे. ही निवड बिनविरोध झाली असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

शिक्षण आणि व्यावसायिक पार्श्वभूमी

त्या उच्चशिक्षित असून त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवी आणि MBA (व्यवसाय व्यवस्थापन) पूर्ण केले आहे. व्यावसायिक राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी IT क्षेत्रात काम केले होते. त्या मूळच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विचारसरणीच्या कुटुंबातील असून त्यांनी ABVP आणि राष्ट्रसेविका समितीमध्येही कार्य केले आहे.

इतर माहिती

त्यांचे पती दीपक नागपुरे हे भाजपचे पुणे शहराचे सरचिटणीस आहेत. त्यांच्या निवडीसोबतच आरपीआयचे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी निवड होणार आहे.

पुणे महापालिका निवडणूक निकाल (PMC Results) : 

  • एकूण जागा: 165
  • भाजप: 119
  • शिवसेना: 0
  • ऊबाठा: 1
  • राष्ट्रवादी (शरद पवार): 3
  • राष्ट्रवादी (अजित पवार): 27
  • काँग्रेस: 15
  • इतर/अपक्ष/एमआयएम: 0

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अमेरिकन टॅरिफ कमी होताच मुंबई शेअर मार्केटची गरुडझेप, घसरणारे सोन्या-चांदिचे दरही वाढले
Weather Update : फेब्रुवारीत पावसाचा इशारा! राज्यात तापमानाची लपंडाव, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस