पुण्यात मुसळधार पाऊस! स्वामी चिंचोली येथे महामार्ग जलमय, वाहून गेली कार तर वाहतूक ठप्प

Published : May 25, 2025, 05:43 PM ISTUpdated : May 26, 2025, 09:58 AM IST
pune heavy rain

सार

पुणे-सोलापूर महामार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. एक कार पाण्यात वाहून गेली, सुदैवाने जीवितहानी टळली. स्थानिकांनी महामार्ग प्राधिकरणाकडून योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप केला आहे.

रावणगाव, दौंड: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. स्वामी चिंचोली परिसरात पाण्याचा जोरदार प्रवाह महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याच दरम्यान एक कार पाण्यात वाहून गेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पाण्याखाली रस्ता, थांबली वाहतूक

स्वामी चिंचोली व निंबोडी परिसरातील ओढ्या-नाल्यांना आलेल्या पूराच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे, दुपारी सुमारे ३ वाजता महामार्गावर पाणी चढले. चिंचोली परिसरात महामार्गाची उंची फारशी नसल्याने जमिनीच्या पातळीवरून वाहणारे पाणी थेट रस्त्यावर आले. यामुळे वाहनचालकांची प्रचंड गैरसोय झाली.

स्थानिकांचा आरोप, दुर्लक्षित उपाययोजना

ग्रामस्थांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, महामार्ग प्राधिकरणाकडून नाले व जलवाहिन्यांची योग्य साफसफाई न केल्यानेच ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. पावसाच्या सुरुवातीलाच असा त्रास होत असेल, तर पुढील काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

कार वाहून गेली, सुदैवाने जीवितहानी टळली

वाहतुकीचा अडथळा सुरू असताना एका कारने पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने कार वाहून गेली. सुदैवाने कारमधील व्यक्तींना वेळीच बाहेर काढण्यात आले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांचा बंदोबस्त

घटनेनंतर महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक वळवण्यासाठी उपाययोजना केल्या. स्थानिक प्रशासनालाही अलर्ट करण्यात आलं असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

स्वामी चिंचोली परिसरात पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग जलमय झाला असून, ही घटना पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रशासनाची तयारी अपुरी असल्याचं संकेत देते. लवकरच योग्य पावले उचलली नाहीत, तर मुसळधार पावसात अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! शेतकरी कुटुंबाला मिळतील 'एवढे' लाख रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
Ladki Bahin Yojana : २१०० रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत ठाम घोषणा