वाढदिवसाच्या दिवशी बंदुकीतून गोळी सुटून घुसली छातीत, पार्टीवर प्रश्नचिन्ह

Published : May 25, 2025, 03:20 PM ISTUpdated : May 25, 2025, 03:21 PM IST
indapur matter

सार

इंदापूर तालुक्यातील एका फार्महाऊसवर वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार झाल्याने एक तरुण जखमी झाला आहे. या घटनेमुळे फार्महाऊस पार्टींमध्ये वाढत्या सुरक्षेच्या चिंतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुणे | प्रतिनिधी शहरात आणि उपनगरात फार्महाऊस पार्टीचं आकर्षण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र या पार्ट्यांमध्ये नियंत्रण हरवत चाललंय का, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इंदापूर तालुक्यातील एक फार्महाऊस अशाच एका 'बर्थडे पार्टी'चं साक्षीदार ठरलं, जेव्हा एक तरुण चक्क गोळीबारात जखमी झाला.

शुक्रवारी रात्री ही घटना घडली. इंदापूरजवळील वडापुरी परिसरातील एका खासगी फार्महाऊसवर वाढदिवस साजरा करत असताना गोळीबार झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. प्राथमिक माहितीनुसार, एकाने बंदुकीतून गोळी झाडली आणि ती थेट या तरुणाच्या छातीत घुसली.जखमी तरुणाला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

या प्रकरणात मुख्य मुद्दा समोर येतोय तो म्हणजे अशा फार्महाऊस पार्टींमध्ये सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. मद्यपान, हत्यारे आणि ढोल-ताशा यांचा धिंगाणा हे नवे ‘नॉर्मल’ झाले आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, प्राथमिक संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना केवळ एक अपघात नाही. ही एका धोकादायक ट्रेंडची झलक आहे. ‘स्टेटस सिंबॉल’ म्हणून उधळणाऱ्या पार्टी संस्कृतीत कायद्याचे आणि जबाबदारीचे पालन कुठे हरवलेय, हाच खरा प्रश्न.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, गोळी झाडणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. तरीही अशा घटनांमुळे फार्महाऊसवर होत असलेल्या अशा बेजबाबदार पार्ट्यांवर प्रशासनाचा वचक आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना सतावत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ladki Bahin Yojana : २१०० रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत ठाम घोषणा
नाताळ–नववर्षाचा धमाका! मुंबई–पुण्यातून विदर्भासाठी मध्य रेल्वेकडून 3 खास गाड्या, वेळापत्रक जाहीर