Pune : गौतमी पाटीलच्या कारचा भीषण अपघात, रिक्षाला धडक देत तिघे जखमी; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

Published : Oct 01, 2025, 08:20 AM IST
Pune

सार

Pune : गौतमी पाटीलच्या कारनं भरधाव वेगात रिक्षेला जोरदार धडक दिल्याने तीन जण जखमी झाले. अपघाताच्या वेळी गौतमी स्वतः कारमध्ये नव्हती. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Pune : सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आपल्या नृत्य आणि अल्बम्समुळे कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिच्या कारचा पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ भीषण अपघात झाला असून यात रिक्षाचालकासह तिघे जखमी झाले आहेत. सुदैवाने अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये नव्हती.

अपघाताची घटना

ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. वडगाव पुलाजवळील एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. त्या रिक्षामध्ये चालकासोबत दोन प्रवासी बसलेले होते. अचानक मागून भरधाव वेगाने आलेल्या गौतमी पाटीलच्या कारनं उभ्या रिक्षेला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जखमींची स्थिती

या अपघातात रिक्षाचालकासह दोन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले. तिघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताच्या फोटोंमधून या घटनेची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे.

पोलिसांचा तपास

सिंहगड रोड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कार आणि तिचा ड्रायव्हर घटनास्थळीच होते. पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यावेळी ही कार सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलची असल्याचे समोर आले. सध्या पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अपघाताची बातमी वाचून डोळ्यापुढं येतील अंधाऱ्या, गोंदियातील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; ४० पेक्षा जास्त प्रवासी जखमी
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ