MHT-CET Result 2024: एमएचटी सीईटी निकाल आज सायंकाळी जाहीर, सहानंतर पाहता येणार निकाल

MHT-CET Result 2024: गतवर्षी पीसीएम ग्रुपमधून ३ लाख १३ हजार ७३० तर पीसीबी ग्रुपमध्ये २ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

 

MHT-CET Result 2024: राज्य समाईक परीक्षा कक्ष सीईटी सेलतर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी पीसीएम- पीसीबी २०२४ चा निकाल केव्हा जाहीर होणार? यासाठी गत एक आठवड्यापासून उमेदवार आणि पालक वाट पाहत होते. अखेर निकालाची प्रतिक्षा संपली असून सीईटी सेल तर्फे रविवार दि. १६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

उमेदवारांना cetcell.mahacet.org/ आणि portal.maharashtracet.org/ या संकेतस्थळावर सहानंतर निकाल पाहता येणार आहे. एमएचटी सीईटी निकालानंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. गतवर्षी पीसीएम ग्रुपमधून ३ लाख १३ हजार ७३० तर पीसीबी ग्रुप मध्ये २ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तसेच पीसीएम आणि पीसीबी ग्रुपमधील प्रत्येकी ७ असे एकुण १४ उमेदवारांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले होते.

असा पाहता येईल निकाल

सीईटी सेलच्या संकेतस्थळाला भेट द्या.

संकेतस्थळावरील एमएचटी सीईटी निकालाच्या लिंकवर जा.

परीक्षा क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पीन टाका.

निकाल पाहून निकालाची प्रत डाउनलोड करा.

आणखी वाचा :

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुगल मॅपने चुकीचा पत्ता दाखवल्याने २० ते २५ विद्यार्थी UPSC परीक्षेपासून वंचित

 

 

Share this article