Manoj Jarange Patil News: '१३ तारखेपर्यंत वाट पाहणार' : मनोज जरांगे पाटील

Published : Jun 16, 2024, 03:30 PM ISTUpdated : Jun 16, 2024, 03:32 PM IST
manoj jarange patil

सार

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे. कोण भेटी द्यायला येते आणि नाही, याकडे समाजाचे लक्ष आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास उपोषण न करता विधानसभा निवडणुकीत उतरून तुमचे उमेदवार पाडू, असा इशाराही जरांगे यांनी दिला. यातच पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सूचक शब्दांत इशारा दिला आहे.

उपोषण स्थगित केल्यानंतर रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या खासदार निलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तत्पूर्वी, १३ तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. आता कोण कोण इथे येते आहे आणि कोण नाही, याकडे आमचे लक्ष लागले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

१३ तारखेपर्यंत वाट बघणार 

आम्ही सरकारला वेळ दिला असून १३ तारखेपर्यंत वाट बघणार आहोत. ज्यांनी यापूर्वी कधी भेट दिली नव्हती, ते सगळे सध्या येत आहेत. आजी-माजी खासदार, आमदार हे पाठिंब्याचे पत्र घेऊन येत आहेत. त्यामुळे समाजाचे लक्ष आहे कोण येत आहे आणि कोण येत नाही. मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे. सर्वांकडूनच अपेक्षा ठेवणे आंदोलकाचे काम असते. माझा मराठ्यांच्या एकजुटीवर आणि चळवळीवर विश्वास आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा :

Manoj Jarange: 'आरक्षणावर तोडगा निघालाच पाहिजे', निलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची केली विचारपूस

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!