पुण्यातील डॉक्टर जोडप्याने परस्पर संमतीने 24 तासांत मोडले लग्न, कारण ऐकून बसेल धक्का!

Published : Dec 27, 2025, 09:00 AM IST

Pune Doctor Couple Divorces Within 24 Hours of Marriage : पुण्यातील एका नवविवाहित जोडप्याने लग्नाच्या 24 तासांच्या आत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परस्पर संमतीने न्यायालयातून आपले लग्न संपवण्याचा निर्णय घेतला. 

PREV
16
खरंच धक्कादायक

लग्नानंतर काही तासांतच जोडपे वेगळे होणे हे खरोखरच धक्कादायक आहे. पण शिक्षणाचे माहेरघर असे बिरुद मिरवणार्या पुण्यात हे घडले आहे. विशेष म्हणजे दोघेही उच्चशिक्षित डॉक्टर आहेत. पुण्यातील वधू-वरांमधील वाद इतका वाढला की, लग्नाला 24 तास उलटले नाहीत तोच त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला.

26
घटस्फोटासाठी अर्ज दाखल

ही घटना पुण्यात घडली असून, जोडप्याने अवघ्या 24 तासांत घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. लग्नानंतर लगेचच त्यांच्यात गंभीर मतभेद निर्माण झाले. मतभेद एवढे टोकाचे होते, की ते मिटले नाहीत. अखेर त्यांना न्यायालयात सामंजस्याने घटस्फोट घ्यावा लागला.

36
पतीने केला खुलासा

महिलेच्या वकिलानुसार, हा प्रेमविवाह होता. दोघे आधी प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर पतीने आपल्या कामाबद्दल खुलासा केला. तो जहाजावर (मर्चंट नेव्हीमध्ये) काम करत होता आणि त्याला सहा महिने घरापासून दूर राहावे लागणार होते. ही बाब मुलीला जराही पसंत पडली नाही.

46
लग्नाआधीच सांगायला हवं होतं

हे ऐकून मुलीला धक्का बसला. इतकी महत्त्वाची गोष्ट लग्नाआधीच सांगायला हवी होती, असे ती म्हणाली. पतीने वेळेवर माहिती न दिल्याने वाद वाढला आणि तरुणी वेगळी राहू लागली. एवढी महत्त्वाची गोष्ट का लपवली याचा तिला प्रचंड राग आला होता. 

56
कायदेशीररित्या घटस्फोट

लग्नानंतर 24 तासांच्या आत ते वेगळे झाले असले तरी, 18 महिन्यांच्या प्रक्रियेनंतर परस्पर संमतीने आता त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे. लग्नाला केवळ २४ तास झाले तेव्हापासून ते दोघे वेगळे राहत आहेत. 

66
शांततेत घेतला निर्णय

पती-पत्नीमधील वैचारिक मतभेद इतके तीव्र होते की त्यांनी आपले लग्न त्वरित संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून शांततेत हा निर्णय घेतला. 

Read more Photos on

Recommended Stories