मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देत २०२६ चं जल्लोषात स्वागत करता यावं, यासाठी महाराष्ट्र सरकारने नागरिकांना आणि हॉटेल व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २४, २५ आणि ३१ डिसेंबर या तीन दिवसांसाठी मद्यविक्रीच्या वेळेत मोठी शिथिलता जाहीर केली आहे.
गृह विभागाच्या विशेष आदेशानुसार, या दिवशी राज्यातील बार, वाईन शॉप्स, परमिट रूम, बीअर बार आणि मद्यालये निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टचा उत्साह रात्री उशिरापर्यंत टिकून राहणार आहे.