Pune : हिंजेवाडीतील रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेल्या पुलावमध्ये आढळलेले मृत झुरळ, FDA कडून अद्याप कारवाई न केल्यानं संताप

Published : Jul 19, 2025, 10:28 AM ISTUpdated : Jul 19, 2025, 10:30 AM IST
Cockroach in Pulav

सार

पुण्यातील हिंजवडी येथील एका रेस्टॉरंटमधून मागवलेल्या पुलावमध्ये मृत झुरळ आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणातील व्यक्तीची प्रकृती बिघडली गेली. तरीही एफडीआयकडून अद्याप कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही. 

पुणे : पुण्यातील हिंजवडी  शहरात रेस्टॉरंट्समधील अन्न स्वच्छतेबाबत वारंवार होणाऱ्या तक्रारींना आणखी एक धक्का बसला आहे. हिंजवडी फेज १ मधील प्रसिद्ध ‘बर्ड व्हॅली’ रेस्टॉरंटमधून मागवलेल्या पुलावच्या डब्यात एका ग्राहकाला थेट एक मृत झुरळ आढळलं. या प्रकारामुळे संबंधित ग्राहकाला उलट्या झाल्या आणि त्याची तब्येतही बिघडली.

ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. परांजपे ब्लू रिज सोसायटीजवळ असलेल्या या हॉटेलमधून ग्राहकाने दोन पुलाव आणि एक दाल तडका ऑर्डर केला होता. जेवण जवळजवळ संपवून टाकल्यावर, पुलाव बॉक्सच्या तळाशी मृत झुरळ दिसल्याने तो एकदम हादरून गेला. त्याने उर्वरित अन्न फेकून दिलं आणि त्यानंतर त्याला वारंवार मळमळ व उलट्या झाल्या.

ग्राहकाने सांगितलं, 

माझ्यासाठी हा अनुभव फारच त्रासदायक ठरला. झुरळ पाहिल्यावर मला अक्षरशः ओकायला लागलं. विशेष म्हणजे ही पहिली वेळ नव्हे. याआधी जेव्हा मी इथं जेवायला आलो होतो, तेव्हा मिळालेल्या जेवणात छोटासा दगड सापडला होता. असं वाटतं, इथं स्वच्छतेचं शून्य भान आहे!

गेल्या आठवड्याभरातील ही चौथी घटना आहे. काही दिवसांपूर्वी एफसी रोडवरील गुडलक कॅफेमध्ये मस्का बनमध्ये काचेचा तुकडा सापडला होता, भिवंडी दरबारमध्ये सूपमध्ये झुरळ आढळलं होतं आणि हिंजवडीतील अरबी मंडी हॉटेलमध्ये कोंबडीचे पंख सापडल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.

या प्रकरणाबाबत अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) सहआयुक्त सुरेश अन्नापुर म्हणाले, “सध्या आमच्याकडे या घटनेची कोणतीही औपचारिक तक्रार आलेली नाही. जर तक्रार दाखल झाली, तर संबंधित हॉटेलवर कठोर कारवाई केली जाईल.”

दरम्यान, पुणे पल्सने बर्ड व्हॅली रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.या प्रकारामुळे हिंजवडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अनेक जण आता नामांकित हॉटेल्समधील अन्न स्वच्छतेवरही शंका घेत आहेत. स्थानिक रहिवाशांनी FDA कडून कठोर तपासणीची मागणी केली असून, भविष्यात अशा आरोग्यघातक घटनांना आळा बसावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!