
पुणे ": पुण्यातील बावधन परिसरातून अटक झालेल्या प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार या भोंदू बाबाने भक्तांच्या श्रद्धेचा कसा विकृत फायदा घेतला, हे समोर येणाऱ्या तपशीलांतून स्पष्ट होत आहे. मोबाईलमध्ये हिडन अॅप डाऊनलोड करून भक्तांवर नजर ठेवणे, समलैंगिक संबंध, आंघोळ घालण्याचे निमित्त करून शारीरिक शोषण, आणि अघोरी क्रियांचा बनाव करत भक्तांच्या भावनांची आणि शारीरिक संबंध असे प्रकार करायचा.
मोबाईल अॅपद्वारे भक्तांच्या आयुष्यात घुसखोरी
प्रसाद बाबा 'ग्रहदोष दूर करण्यासाठी' अशी सबब देत भक्तांकडून मोबाईल घेऊन “कंपास अॅप” डाऊनलोड करायचा. प्रत्यक्षात मात्र, तो गुपचूप "AirDroid Kid” हे अॅप इन्स्टॉल करायचा. हे अॅप पालक मुलांच्या मोबाईलवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरतात. त्याच्या मदतीने बाबा भक्तांच्या मोबाईलचा पूर्ण एक्सेस मिळायचा. कॅमेरा, लोकेशन, अॅप्स, चॅट, अले सर्व काही.यामुळे बाबा भक्तांच्या हालचाली, कपड्यांचे रंग, कोणासोबत वेळ घालवला अशा सगळ्या गोष्टी कळायच्या. पण भक्तांना बाबांना 'साक्षात्कार' होतोय आणि बाबा देखील मला असेच संकेत मिळतात याबद्दलचा दावा करायचा. यामुळे त्याच्याबद्दलची भक्तांमध्ये अंधश्रद्धा आणि विश्वास वाढायचा.
महिला भक्तांसोबत नाच
प्रसाद बाबाचे महिलांसोबत नाचतानाचे, त्यांच्याशी संवाद साधतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनेक महिला आणि पुरुष भक्त त्याच्या मठात नियमित येत असत. पण विश्वास संपादन करून तो पुरुष भक्तांचे अंग चोळणे, त्यांना अंघोळ घालणे, इथपासून सुरुवात करायचा.
झोप न घेण्याचा सल्ला’ आणि अघोरी चाळे
प्रसाद बाबा विशेष साधना सांगून भक्तांना सलग दोन दिवस केवळ तीन तास झोपण्याचा सल्ला द्यायचा. मग त्यांना मठात बोलावून सर्व कपडे उतरवून फक्त शाल पांघरून झोपायला** सांगायचा. झोपेच्या अतिरेकामुळे भक्त झोपी गेल्यावर प्रसाद बाबा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. नंतर 'तुझं सगळं दुःख मी घेतलं' असं सांगून भक्तांना लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडायचा.
भोंदूगिरीतून शोषण
प्रसाद तामदारच्या भोंदूगिरीविषयी अनेक धक्कादायक तक्रारी समोर येत आहेत. पोलिसांनी तामदारसोबत अन्य काही सहकाऱ्यांनाही ताब्यात घेतलं असून, अशा पीडित भक्तांना पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाबा की ब्लॅकमेलर?
तामदारचा मठ एका ‘दिव्य साक्षात्कार’ वर उभा असल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला होता. पण प्रत्यक्षात हा मठ भक्तांकडून पैसे उकळण्यासाठी, आणि त्यांच्या लैंगिक शोषणासाठी वापरण्यात येत होता – हे स्पष्ट झालं आहे. त्याने C.A. पर्यंत शिक्षण घेतलं असल्याचं भासवत, आपली विद्वत्ता दाखवून भक्तांना प्रभावित केलं.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.