पूजा खेडकरच्या आईसंबंधित दोन कंपन्यांना टाळे, प्रॉपर्टी टॅक्स न दिल्याने कारवाई

Published : Jul 20, 2024, 08:31 AM ISTUpdated : Jul 20, 2024, 10:28 AM IST
FIR against IAS Puja Khedkar

सार

पूजा खेडकरच्या आईसंबंधित असणाऱ्या दोन कंपन्यांना आता टाळे लावण्यात आल्याची मोठी कारवाई पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात आली आहे. कंपन्यांनी दोन वर्षांपासून प्रॉपर्टी टॅक्स थकवल्याने त्या सील करण्यात आल्या आहेत.

Trainee IAS officer Puja Khedkar : ट्रेनी आयएएस पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होत चालली आहे. आता पूजा खेडकरच्या आईसंबंधित दोन इंजिनिअरिंग कंपन्यांना टाळे लावण्यात आले आहे. पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड महापालिकेने इंजिनिअरिंग कंपनीवर मोठी कारवाई करत टाळे लावले. खरंतर, कंपनीने गेल्या दोन वर्षांपासून प्रॉपर्टी टॅक्स न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सध्या एका गुन्ह्याखाली पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी मुशळी जिल्ह्यातील धाडवाली गावात वर्ष 2023 मध्ये जमिनीच्या वादासंदर्भात काहींना बंदुकीचा धाक दाखवत धमकवल्याच्या आरोप मनोरमा खेडकर यांच्यावर असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

महापालिकेकडून इंजिनिअरिंग कंपन्यांना लावले टाळे
पिंपरी चिंचवड महापालिकेने म्हटले की, प्रॉपर्टी टॅक्स न भरल्याने तलावडे परिसरात बंद पडलेली कंपनी थर्मोवेरिटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला आम्ही टाळे लावले आहे. पीसीएमसी आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले की, थर्मोवेरिटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा वर्ष 2022 ते 2024 पर्यंतचा प्रॉपर्टी टॅक्स थकीत आहे. सध्याच्या सुरु असणाऱ्या वर्षाचाही प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही. याआधी वर्ष 2023 मध्ये प्रॉपर्टी टॅक्स न भरल्याने थेट कारवाई केली नव्हती. त्यावेळी नोटीस धाडण्यात आली आणि टप्याटप्याने आम्ही सर्वप्रथम कंपनीच्या पाण्याचे कनेक्शन बंद केले.

पीसीएमसी इंजिनिअर मकरंद निकम यांनी म्हटले की, त्या इमारती रेड झोनमध्ये येतात. आम्ही अशा इमारतींना परवानगी देत नाही. यामुळे त्या अनाधिकृत इमारती असल्याने आधी आम्ही त्यांना प्रथम नोटीस धाडतो.

कंपनीवर 1.96 लाख रुपांची थकबाकी
अधिकाऱ्यांनी म्हटले की, गेल्या दोन वर्षांमध्ये एकूण 1.96 लाख रुपये थकबाकी आहे. याशिवाय यंदाच्या वर्षातील थकबाकी जोडल्यास रक्कम 2.77 लाख रुपये होते. दरम्यान, पूजा खेडकरने आरक्षणाअंतर्गत सिव्हिल सेवांमध्ये निवड होण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना तिने आपल्या निवासाचा पत्ता म्हणून इंजिनअरिंग कंपनीचा पत्ता दिला होता.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचीही पूजा खेडकरच्या विरोधात कारवाई
केंद्रीय लोकसेवा आयोगने शुक्रवारी ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडरच्या विरोधाक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये बनावट ओखळ पत्राच्या माध्यमातन सिव्हिल सेवा परीक्षा दिल्याच्या आरोपाखाली पूजा खेडकरच्या विरोधात एपआयआर दाखल करण्यात आला आहे. आयोगाने सिव्हिल सेवा परीक्षा 2022 साठी पूजाची उमेदवारी रद्द करत आणि भविष्यातील परिक्षांमध्ये न बसता येण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही जारी केली आहे. वर्ष 2023 बॅचची आयएएस अधिकारी खेडकरवर नुकत्या काही काळाआधी पुण्यात आपल्या प्रशिक्षणादरम्यान विशेषधिकारांचा दुरपयोग करत आणि सिव्हिली सेवांमध्ये निवड होण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

आणखी वाचा :

मनोरमा खेडकर यांचे इंदुबाई नाव कसे पडले? महाडमधून पोलिसांनी केले अटक

लाखोंची लाच मागितली, दोनदा निलंबित; पूजाचे वडील दिलीप खेडकरांचा कारनामा उघड

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Pune Cab Dispute : पुण्यात आयटी तरुणीचा ३०० रुपये कॅब भाडं देण्यास नकार, ड्रायव्हरला दिली पोलिसांची धमकी
Wardha Doctor Slapped : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरच्या कानशिलात लगावली, CCTV व्हिडिओ व्हायरल