कोल्हापूरजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; एकाचा घटनास्थळीच मृत्यू

Published : May 24, 2025, 10:00 AM ISTUpdated : May 24, 2025, 11:46 AM IST
KSRTC bus accident

सार

पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय काहीजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Accident News : पुणे-बंगळुरू महामार्गावर टोप-संभापूरजवळ आज सकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव ट्रॅव्हल्सने समोरून जात असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्याच क्षणी ट्रॅव्हल्सच्या मागून भरधाव वेगाने आलेली ओमनी कारदेखील ट्रॅव्हल्सवर आदळली. या तिहेरी अपघातात एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर काहीजण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला असून, घटनास्थळी पोलीसांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाल्याचे दृश्य दिसून आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

PREV
Read more Articles on

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर