Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी… कुठे आणि कधी असणार सुट्टी?

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

 

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून दरम्यान सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

सरकारने जाहीर केलेली सुट्टी राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, कंपन्या व संस्थाना लागू राहील. जर अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास अशा व्यवस्थापनाने कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी आस्थापना किंवा कारखाना मालकाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.

सात टप्प्यातील निवडणूक होणार :

पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 26 एप्रिलला होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक 7 मे रोजी होणार आहे.

चौथ्या टप्प्यातील निवडणूक 13 मे रोजी होणार आहे.

पाचव्या टप्प्यातील निवडणूक 20 मे रोजी होणार आहे.

सहाव्या टप्प्यातील निवडणूक 25 मे रोजी होणार आहे.

सातव्या टप्प्यातील निवडणूक 1 जून रोजी होणार आहे.

राज्यातील 48 लोकसभा जागांवर पाच टप्प्यात मतदान :

पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल, 2024

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल, 2024

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे, 2024

रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे, 2024

नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे, 2024

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे,मुंबई, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण. 

आणखी वाचा :

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ठरल्यास राहुल गांधींनी माघार घ्यावी, राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी दिला सल्ला

Lok Sabha Election 2024: इंडी आघाडीच्या कोणत्या नेत्यावर पंतप्रधान मोदी बोले? विरोधकांच्या मनात विष भरले असल्याचा देखील उल्लेख

Read more Articles on
Share this article