पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टर सेवेशी केली गद्दारी, डॉ. अजय तावरे यांना अटक

Published : May 27, 2024, 10:33 AM IST
pune hadsa

सार

पुणे हिट अँड रन केसमधील आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयाचे डॉक्टर मागे राहिले नाहीत. अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. अजय तावरे यांच्याशी अगरवाल यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला होता. त्यामुळे तावरे यांना अटक करण्यात आली आहे. 

पुणे हिट अँड रन प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेत रोजच नवीन घटना घडत असून समाजमानावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबियांकडून नियमबाह्य सर्व गोष्टी केल्या जात असल्याचे लक्षात येत आहे. आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. 

अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये करण्यात आला फेरफार - 
अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यात आल्याचे कारण समोर आले आहे पुणे पोलिसांनी डॉ. अजय तावरे यांना अटक केली आहे. त्यांना ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. डॉ. अजय तावरे हे ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबचे HOD म्हणून कार्यरत असून त्यांनी ही फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्यासोबत अजून एक डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. 

ब्लड रिपोर्टबाबत काय आले समोर - 
आरोपीने दोन जणांना उडवल्यानंतर त्याचा ब्लड रिपोर्ट घेणे अत्यंत आवश्यक होते. त्या ब्लड रिपोर्टमध्ये तो दारू पिला होता का नाही हे समोर येऊ शकणार होते. त्यामुळे याबाबतचा अहवाल जाणून घेणे आवश्यक होते. पण पोलिसांनी अजूनही याबाबतची माहिती दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. तावरे यांना अटक करून पोलीस काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरला धमकावून साक्ष बदलायला लावल्याचे समोर आले आहे. यामुळे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे. अगरवाल कुटुंबातील तिन्ही पिढ्या जेलमध्ये असून या गुन्ह्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 
आणखी वाचा - 
मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर जवळून करण्यात आला गोळीबार, परिसरात तणावाचे वातावरण
महाळंगीत वीज पडून 2 शेतकरी जागीच ठार

PREV

Recommended Stories

भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!
Ration Card : दीड वर्षानंतर रेशनकार्ड धारकांना बंपर लॉटरी! 'या' वस्तूचा लाभ मिळणार, लगेच तपासा!