
Nashik: सध्याच्या काळात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. नाशिकमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने आत्महत्या केल्याची दुर्घटना घडली आहे. पूजा दीपक डांबरे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या आत्महत्येच्या प्रकरणी आडगांव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आई, तुझी कामामुळे खूप धावपळ होते. तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार आहे. तू टेन्शन घेऊ नको, असं मुलीने इंग्लिशमधून सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या आशयाची सुसाईड नोट इंग्रजीत लिहून एका महिला पोलिस अंमलदाराच्या लेकीने गळफास घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
आडगाव पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी माहिती देताना लिहिलं आहे की, पूजाने बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील पदवीला प्रवेश घेतला. वडील आणि आई दोघेही वेगळे राहत असल्यामुळे पूजा ही तिच्या आईकडे राहत होती. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पूजा शिक्षण करत होती.
मात्र, दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक तिने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी पाठविला. सुसाइड नोट जप्त करीत तपास सुरू केला.