Operation Tiger | ऑपरेशन टायगर यशस्वी? उबाठाच्या बैठकीला हे 6 खासदार गैरहजर, दिल्लीत हालचालींना वेग

Published : Jun 18, 2026, 12:43 PM IST
Operation Tiger

सार

Operation Tiger : उबाठा गटाने बोलावलेल्या संसदीय दलाची ११ वाजता बैठक पार पडली. या बैठकीला सर्व खासदारांनी उपस्थितीत राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. मात्र सहा विश्वासू खासदार बैठकीला आलेच नाहीत.

Operation Tiger :  उबाठा पक्षाने आज दिल्लीत बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासाठी सर्व खासदारांना व्हिप बजावण्यात आला होता. तरीही लोकसभेतील नऊपैकी फक्त तीन खासदार उपस्थित राहिले.  अशातच सहा खासदारांच्या अनुपस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

बैठकीला केवळ तीन खासदारांची उपस्थिती

दिल्लीत झालेल्या बैठकीला लोकसभा खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. राज्यसभेतील खासदार संजय राऊतही बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित खासदारांशी चर्चा करत पुढील राजकीय रणनीतीवर विचार केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सहा खासदार अनुपस्थितीत

संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील हे सहा खासदार बैठकीसाठी अनुपस्थित राहिले. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा रंगली होती. याशिवाय स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भातील एक पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केल्याचे बोलले जात होते. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

लोकसभा अध्यक्षांकडे व्हीप उल्लंघनाची तक्रार करण्याची तयारी

सूत्रांच्या माहितीनुसार, व्हीपचे उल्लंघन केल्याचा मुद्दा उपस्थित करत उबाठा गटाकडून लोकसभा अध्यक्षांना पुन्हा पत्र देण्याची तयारी सुरू आहे. अनुपस्थित राहिलेल्या खासदारांविरोधात कारवाईची मागणी करण्याचाही पर्याय पक्षाकडून केला जात असल्याचे सांगितले जातेय.

बैठकीला उपस्थित असलेले नेते

  • संजय राऊत (राज्यसभा)
  • राजाभाऊ वाजे (लोकसभा)
  • अनिल देसाई (लोकसभा)
  • अरविंद सावंत (लोकसभा)

बैठकीला गैरहजर असलेले खासदार

  • संजय दिना पाटील
  • भाऊसाहेब वाकचौरे
  • नागेश पाटील आष्टीकर
  • संजय जाधव
  • ओमराजे निंबाळकर
  • संजय देशमुख

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक