काय सांगताय ! पोस्टाने येणार घरपोच हापूस आंबा, तो ही देवगडचा ?

उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रतीक्षा असते की, आंबे केव्हा खायला मिळणार. त्यात पण अनेकांना खरा हापूस आंबा मिळणार का ? असा प्रश्न पडलेला असतो. पण आता हे संपूर्ण टेन्शन घायची गरज नाही. कारण देवगडचा हापूस आंबा आता तुम्हाला घरपोच मिळणार आहे तेही पोस्टाने.

Ankita Kothare | Published : Apr 1, 2024 7:10 AM IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रतीक्षा असते की, आंबे केव्हा खायला मिळणार. त्यात पण अनेकांना खरा हापूस आंबा मिळणार का ? असा प्रश्न पडलेला असतो. पण आता हे संपूर्ण टेन्शन घायची गरज नाही. कारण देवगडचा हापूस आंबा आता तुम्हाला घरपोच मिळणार आहे तेही पोस्टाने. होय ही बातमी खरी आहे.

कोकणातील हापूसची चव सर्वात वेगळी. यामुळे देशात नाही तर विदेशातही हापूस आंब्यांना मागणी असते. परंतु बाजारात मिळत असणारा हापूस आंबा अस्सल आहे का? अशी शंका नेहमीच उपस्थित केली जाते. आता भारतीय डाक विभागाने घरपोच हापूस आंबे सेवा सुरु केली आहे. यामध्ये ग्राहकांना अस्सल सेंद्रिय हापूस आंबे घरपोहोच मिळणार आहे. भारतीय पोस्ट विभागाने उत्पादक ते ग्राहक अशी ही सेवा सुरू केली आहे. त्यात देवगडचा अस्सल हापूस मिळणार आहे.

पोस्टाचा अनोखा उपक्रम :

भारतीय टपाल विभाग नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो. आता प्रथमच हापूस आंबे ग्राहकांना पोस्ट विभाग उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठी थेट उत्पादकांना ग्राहकाशी जोडण्याचे पाऊल पोस्ट विभागाने उचलले आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्याचा माल ग्राहकांपर्यंत योग्य दरात देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही बाजारपेठ मिळणार आहे. सध्या ही सुविधा राज्यातील काही निवडक टपाल कार्यालयात सुरु करण्यात आली आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार:

• ग्राहकांना आगाऊ नोंदणी करुन आंबा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे.

• पेटी घरपोहोच हवी असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

• नोंदणी केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या आंबा पेटीच्या डिलिव्हरीची तारीख कळविण्यात येणार आहे.

देवगडचा हापूस घरपोच :

पोस्ट विभागाने कोकणातील दहिबाव (ता. देवगड) येथील शेतकरी श्रीधर ओगले यांच्याशी करार केला आहे. त्यांच्या आंबा बागेतील आंब्यास जीआय मानांकन मिळाले आहे. कोणत्याही रासायनिक पद्धतीच्या वापर शिवाय नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा ते उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना खात्रीशीर उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. ओगले आंबा व्यवसायात १८ वर्षांपासून आहे.

मुंबई, पुणे शहरात मिळणार आंबा :

रत्नागिरी पोस्ट कार्यालयामार्फत पुणे, मुंबईत सुद्धा आंबा मिळणार आहे. त्यासाठी काही दिवसांत आंब्याच्या बुकिंगची योजना सुरू केली जाणार आहे. त्यासाठी रत्नागिरी पोस्ट कार्यालयामार्फत नोंदणी करावयाची पोस्ट कार्यालये सुद्धा जाहीर होतील. ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था सध्या केलेली नाही.

आणखी वाचा :

'निवडणुकीत विजय झाल्यास व्हिस्की अन् बिअर देणार...',चिमूरच्या वनिता राऊत यांचे मतदारांना विचित्र आश्वासन

1 एप्रिलपासून LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 32 रुपयांनी घट, जाणून घ्या मुंबई ते दिल्लीतील नवे दर

दिल्लीजवळ भीषण कार अपघातात अपघातात ड्रायव्हर सोबत 2 मुलांचा मृत्यू, उभ्या ट्रकला जाऊन ठोकली एसयूव्ही गाडी

Share this article