Nashik News : निफाडमध्ये शेततळ्यात बुडून 2 भावंडांचा मृत्यू

Published : May 29, 2024, 03:51 PM IST
drown

सार

निफाड तालुक्यात शेततळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन अल्पवयीन सख्या भावांचा मृत्यू झाल्याने नाशिकवर शोककळा पसरली आहे.

निफाड तालुक्यात शेततळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन अल्पवयीन सख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी हे दोन भावंड गेले होते. मात्र, तळ्यात पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकमधील दहा दिवसात बुडून मृत्यू होणार्‍यांची ही चौथी घटना आहे.

शेततळ्यात पडून दोघांचा मृत्यू निफाड येथील शेतकरी गोपाल जयराम ढेपले यांची मुले प्रेम गोपाल ढेपले व प्रतिक गोपाल ढेपले हे वीजपंप सुरु करण्यासाठी शेतात गेलेले होते. दोनही मुले घरी लवकर परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यास गेलेल्या कुटुंबियांना दोनही मुले हे तळ्यातील पाण्यावर तरंगताना दिसून आले. त्यांना तात्काळ निफाड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे दिले सोपवण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!