Namo Shetkari Mahasanmman Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'चा 7वा हप्ता आज खात्यात येणार

Published : Sep 09, 2025, 10:53 AM IST
Kisan Samman Nidhi Installment Date

सार

'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आज सातवा हप्ता जमा होणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार आहेत. 

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या **‘नमो शेतकरी महासन्मान निधी’** योजनेअंतर्गत सातवा हप्ता आज मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी वितरित केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार?

या हप्त्याचा लाभ राज्यातील तब्बल ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात २ हजार रुपये जमा होतील. या वितरणासाठी राज्य सरकारने १ हजार ९३२ कोटी ७२ लाख रुपये निधीची तरतूद केली असून नुकतीच त्यास मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्र व राज्य सरकारची संयुक्त मदत

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. राज्य सरकारने त्यात आणखी ६ हजार रुपयांची भर घालून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण वर्षाकाठी १२ हजार रुपयांचा फायदा मिळतो. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी दिला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून सातवा हप्ता वितरित होत आहे. यापूर्वीचे सहा हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

हप्ता जमा झाला का? तपासण्याची प्रक्रिया

शेतकऱ्यांना आपला हप्ता जमा झाला आहे का, हे ऑनलाईन तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी NSMNY अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे.

लॉगिन करण्यासाठी नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक किंवा आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक अशा तीन पर्यायांपैकी एक निवडता येतो. त्यानंतर कॅप्चा भरून Get Aadhaar OTP वर क्लिक केल्यास मोबाईलवर ओटीपी येतो. ओटीपी भरल्यानंतर संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसते. यात शेतकऱ्याचे नाव, नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर आणि मिळालेले हप्ते याचा तपशील असतो. जर Eligibility Details हा पर्याय दिसला तर शेतकरी योजनेसाठी पात्र आहे असे समजते, पण Ineligibility दिसल्यास तो अपात्र मानला जातो व त्यामागचे कारणही नोंदवलेले असते.

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

अनिश्चित पावसाळा, कर्जाचा ताण, मजुरीचा खर्च आणि शेतीशी संबंधित इतर अडचणींमध्ये या हप्त्याचे आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरते. छोट्या-मोठ्या गरजा भागवण्यासाठी आणि कुटुंबाला दिलासा देण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरते. त्यामुळे आज लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारा हा हप्ता मोठा दिलासा ठरणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो
मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी 'डोकेदुखी'; सलग 3 दिवस सेवा ठप्प, 14 एक्स्प्रेस रद्द, अनेक गाड्यांना 'मेगा' विलंब!