Mumbai Nagpur Diwali Special Trains: दिवाळीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर, पुणे ते नागपूर मार्गावर विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. या जादा गाड्या २६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावणार आहेत.
दिवाळीचा सण जवळ आला की रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी होते. घरच्या मंडळींना भेटण्यासाठी आणि सण साजरा करण्यासाठी हजारो प्रवासी मुंबईहून नागपूरकडे निघतात. या वाढत्या गर्दीची दखल घेत मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई ते नागपूर मार्गावर सहा आणि पुणे ते नागपूर मार्गावर बारा विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या जादा फेऱ्या 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान धावणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
25
गाडी क्रमांक आणि वेळापत्रक
गाडी क्रमांक 01011 (सीएसएमटी – नागपूर विशेष)
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून मध्यरात्री 12.20 वाजता सुटेल आणि दुपारी 4.05 वाजता नागपुरात पोहोचेल.
35
गाडी क्रमांक आणि वेळापत्रक
गाडी क्रमांक 01012 (नागपूर – सीएसएमटी विशेष)
परतीची ही गाडी नागपूरहून रात्री 10.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2.05 वाजता मुंबईत पोहोचेल.
या विशेष गाड्या खालील प्रमुख स्थानकांवर थांबतील. दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला आणि वर्धा.
55
आरक्षणाची माहिती
या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून, प्रवाशांनी लवकरात लवकर आपली तिकिटे बुक करावीत, कारण दिवाळीच्या काळात सीट्स झपाट्याने भरत आहेत. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे दिवाळीच्या गर्दीत मुंबई–नागपूर प्रवास अधिक सोयीचा आणि सुलभ होणार आहे.