
CM Ladki Bahin Yojna : अर्थमंत्री अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी राज्यभरातील सरकारी कार्यालयामध्ये महिलांची मोठी झुंबड उडाली आहे. प्रचंड गर्दीमुळे अनेक ठिकाणी महिलांना योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. मात्र, महिलांना हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही भरता येईल. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पीडीएफ फाईल डाऊनलोड करुन तुम्हाला त्यावर नाव, पत्ता आणि इतर सगळे तपशील भरावे लागतील. त्यानंतर हा भरलेला फॉर्म पुन्हा संकेतस्थळावर अपलोड करुन त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो सबमिट करावा लागेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो अर्ज देण्यात आला त्यावर इतर सरकारी कामांसाठी आपण ज्याप्रकारे वैयक्तिक तपशील भरतो, तीच पद्धत वापरायची आहे. या फॉर्ममध्ये महिलांना आधी त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्म ठिकाण, पिनकोड ही माहिती भरावी लागेल. याशिवाय, तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकही न विसरता अर्जात नमूद करावा. याशिवाय, महिलांना वैवाहिक स्थितीच माहिती देणेही अर्जात बंधनकारक आहे.
याशिवाय, या अर्जात तुम्ही कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. एखादी महिला सरकारी योजनेची लाभार्थी असेल तर तिला संबंधित योजनेच्या माध्यमातून महिन्याला किती पैसे मिळतात, हे अर्जात नमूद करावे लागेल.
यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला ज्या बँक खात्यामध्ये हवे आहेत, त्याचा तपशील भरावा लागेल. यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खात्याचा क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित बँकेचा IFSC Code हे सर्व तपशील अचूक भरावे लागतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असणे महत्त्वाचे आहे. त्याचा तपशीलही अर्जात नमूद करावा लागेल. सगळ्या शेवटी अर्ज भरणारी महिला कोणत्या वर्गात मोडते, हे स्पष्ट करावे लागेल. अर्ज भरणारी महिला सामान्य गृहिणी असेल तर सामान्य गृहिणी या पर्यायासमोर खुण करावी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
कोण असणार पात्र?
महाराष्ट्र रहिवासी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र कोण असेल?
2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
घरात कोणी Tax भरत असेल तर
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
लागणारी कागदपत्रे
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.
आणखी वाचा :