MSRTC Latest Update: MSRTC ची नवी नियमावली जाहीर!, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकिट सवलतींसाठी आता ‘हे’ नियम पाळणे आवश्यक

Published : Sep 09, 2025, 05:48 PM IST

MSRTC Latest Update: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकिट सवलतींमध्ये बदल केले आहेत. सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

PREV
15

MSRTC Latest Update: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकिट सवलतीत महत्त्वाचे बदल केले आहेत. याआधीपर्यंत मिळणारा मोफत प्रवासाचा लाभ आता काही अटी व शर्तींसह मिळणार असून, ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे.

25

महिला प्रवाशांसाठी बदललेले नियम

मार्च 2023 पासून महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बससेवेवर साधी, मिनी, निमआराम, शिवशाही आणि शिवशाही स्लीपर 50% सवलत दिली जात होती. ही सवलत अजूनही लागू आहे, मात्र आता विशेष ओळखपत्राशिवाय सवलतीचा लाभ मिळणार नाही.

महिला सवलतीसाठी महत्त्वाचे नियम

राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य.

ओळखपत्र नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जाईल.

ही सवलत महाराष्ट्र राज्यापुरतीच मर्यादित आहे.

पनवेल-ठाणे यांसारख्या काही शहरांतर्गत मार्गांवर ही सवलत लागू नसेल.

या अटीमुळे सवलतीच्या लाभात पारदर्शकता येणार असून, योजनेचा गैरवापर टळेल, असं MSRTC प्रशासनाचं म्हणणं आहे.

35

ज्येष्ठ नागरिकांसाठी ताजे अपडेट्स

ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या तिकिट सवलतींमध्येही दोन वयोगटांनुसार वेगळे नियम लागू करण्यात आले आहेत.

65 ते 75 वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक: 50% तिकीट सवलत

75 वर्षांवरील नागरिक: मोफत प्रवास

या सवलतींमुळे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ, आरामदायक आणि आर्थिकदृष्ट्या हलका होईल.

सवलतीसाठी आवश्यक

अधिकृत ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य

ओळखपत्र नसेल तर पूर्ण तिकीट आकारले जाईल

45

या निर्णयामागील उद्देश काय?

एसटी महामंडळाचा उद्देश स्पष्ट आहे

सवलतींचा लाभ खरंच पात्र असलेल्या प्रवाशांपर्यंतच पोहोचावा.

त्यामुळे, सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी ओळखपत्रासारख्या अटी लागू केल्या जात आहेत. यामुळे योजना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि व्यवस्थीत राबवता येणार आहे.

55

वाचकांसाठी सूचना

जर तुम्ही महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, आणि एसटी प्रवासात सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर लवकरात लवकर तुमचं MSRTC ओळखपत्र बनवा आणि प्रवासात नेहमी सोबत ठेवा.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories