एसटी महामंडळात १७,७४२ पदांची 'मेगाभरती'! कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नशीब फळफळणार; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

Published : Mar 12, 2026, 04:39 PM IST

MSRTC recruitment for 17742 posts: राज्य सरकारने एसटी महामंडळात तब्बल १७,७४२ पदांच्या महाभरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत प्राधान्य दिले जाणार आहे. 

PREV
15
एसटी महामंडळात १७,७४२ पदांची 'मेगाभरती'!

मुंबई: राज्याची जीवनवाहिनी असलेल्या 'लाल परी'च्या प्रवाशांसाठी आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाचा (MSRTC) कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून, तब्बल १७ हजार ७४२ पदांच्या महाभरतीची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

25
कोणाला मिळणार संधी?

विधीमंडळात आमदार श्रीकांत भारतीय यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी ही माहिती दिली. या भरती प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, सध्या कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. २०२२ च्या संपकाळात नियुक्त केलेल्या २,१२५ कंत्राटी चालकांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

35
५ हजार नवीन बसेसचा ताफा येणार

एसटी महामंडळाला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस मिळवून देण्यासाठी केवळ कर्मचारीच नव्हे, तर गाड्यांची संख्याही वाढवली जात आहे.

दरवर्षी ५,००० नवीन बसेस खरेदी करण्याचा सरकारचा मानस आहे.

यापैकी ३,००० बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

टाटा मोटर्सला २,१०० बसेस पुरवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

वाढत्या गाड्यांच्या संख्येमुळे चालक आणि वाहकांची मोठी कमतरता भासत असल्याने ही भरती तातडीने केली जाणार आहे.

45
भरती प्रक्रिया कधी सुरू होणार?

महाभरतीचा सविस्तर प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे (Finance Department) मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तिथून हिरवा कंदील मिळताच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होऊन भरती प्रक्रियेला वेग येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

55
महत्त्वाची टीप

कंत्राटी तरुणांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून अल्प मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories