Pune porsche Accident : पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक, ब्लड सॅम्पल प्रकरणात हात असल्याचा संशय

पुणे पोर्शे कार अपघातातील घटना रोज समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल यांना आता अटक करण्यात आली असून ब्लड सॅम्पल प्रकरणात त्यांनी पैसे देऊन रिपोर्ट बदलल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

vivek panmand | Published : Jun 1, 2024 3:46 AM IST

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात रोज वेगवेगळ्या घटना समोर येताना दिसून येत आहेत. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्या घरी नव्हत्या पण पोलिसांनी त्यांना शोधून अटक केली आहे. मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

अल्पवयीन आरोपीची केली जाणार चौकशी - 
पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहे. त्याची चौकशी एक पोलीस आयुक्त आणि दोन महिला पोलीस करणार आहेत. घटना घडल्यापासून आजपर्यंत त्याची चौकशी केली नव्हती. पुणे पोलिसांनी बाल सुधारगृहाला पत्र पाठवून त्याच्या चौकशीची परवानगी मिळवली आहे. आजपर्यंत मुलाची चौकशी केली नसून आता त्याच्या चौकशीला सुरुवात केली जाणार आहे. मुलाच्या भावाला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना करण्यात आली अटक - 
अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. विशाल अगरवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र अगरवाल या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरेंद्र अगरवाल यांना ड्रायव्हरला धमकावून जबाब बदलायला सांगितले, म्हणून अटक करण्यात आली आहे. विशाल अगरवाल याच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून त्याबद्दलची माहिती आता समोर येत आहे.
आणखी वाचा - 
खासदार प्रज्वल रेवण्णाला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी, सगळीच प्रकरण येणार बाहेर?
24X7 एसी वापरत असाल तर नक्की या टिप्स लक्षात ठेवा, नोएडा घटनेनंतर अग्निशमन विभागाने सांगितल्या टिप्स

Share this article