
मुंबईकरांसाठी पुढील तीन दिवस खूप खूप जिकरीचे ठरणार आहेत. आता त्याला कारणही तसेच खास असून मुंबईकरांसाठी या तीन दिवसांमध्ये तारेवरची कसरत राहणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारापासून महा मेगाब्लॉकला सुरुवात झाली आहे हा तब्बल ६३ तासांचा ब्लॉक असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे. रविवारी दुपारी ३.३० पर्यंत हा ब्लॉक असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोणत्या फलाट क्रमांकाची वाढवली जाणार रुंदी -
या तीन दिवसांमध्ये रेल्वेकडून प्रवाशांना प्रवास कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील १० आणि ११ क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यात येत आहे. तसेच ठाणे स्थानकावरील ५ आणि ६ फलाट क्रमांकांची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्या दरम्यान ९३० गाड्या बंद करण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांची मोठया प्रमाणावर गैरसोय होणार आहे.
प्रवाशांची गर्दी झाली कमी -
या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशनवर अजिबात गर्दी नसून प्रवाशी या काळात रेल्वेकडे फिरकले सुद्धा नसल्याचे दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते सीएसटी दरम्यान तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक आहे. हा मेगाब्लॉक शुक्रवारी रात्री चालू झाला असून तो रविवार दुपारपर्यंत चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी एकूण ९३० रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. शुक्रवारी 161, शनिवारी 534, रविवारी 235 लोकल फिऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना रेल्वेचा प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा -
कर्नाटक सेक्स व्हिडिओ टेप कांड: प्रज्वल रेवन्नाला अटक करून आज कोर्टात केले जाणार हजर, इतर माहिती घ्या जाणून
Jammu Bus Accident : जम्मूमध्ये बस 150 फूट खोल दरीत कोसळली, 15 जणांचा मृत्यू