महाराष्ट्रातील नागपूर येथील तापमान मोठ्या प्रमाणावर तापायला सुरुवात झाली असून येथील तापमान ५६ डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊन पोहचले आहे. उन्हाच्या वेळी बाहेर जाऊन अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवत आहे.
आयएमडीने नागपुरात स्थापन केलेल्या चार हवामान केंद्राची स्थापना केली आहे. यातील दोन हवामान केंद्रांचे तापमान दिल्लीपेक्षा जास्त नोंदवण्यात आले आहे. मंगेशपूर या गावात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात तापमान मोजण्यात आले, जे स्वयंचलित हवामान केंद्र म्हणूनही काम करते. दिल्ली स्टेशनने ५२.९ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले होते.
नागपूरमध्ये किती नोंदवण्यात आले तापमान -
नागपूरमध्ये सर्वात जास्त असे ५६ डिग्री सेल्सियस एवढे तापमान नोंदवण्यात आले होते. तर दुसऱ्या बाजूला ५४ डिग्री सेल्सियस एवढे तापमान नोंदवण्यात आले होते. बाकी दोन ठिकाण ४४ डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले होते. दिल्लीतील उष्णतेमुळे येथील तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तापमान हे ३८ डिग्री सेल्सियसच्या पुढे गेल्यावर त्रास होऊ शकतो असे सांगितले होते.
तापमान नोंदवण्यात होत आहे चूक -
तापमान नोंदवण्यात चूक होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये मोजले जाणारे तापमान हे ३८-४० डिग्री सेल्सियस पेक्षा पुढे गेले की ते बरोबर मोजता येत नाही. त्यामध्ये अडचण येत असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील तापमान बदलत असले तरी हवामान केंद्राजवळच्या घटकांवरच त्याचे तापमान मोजले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. काही हवामान केंद्रावर मानवनिर्मित काम चालत असल्यामुळे तेथील तापमान हे बरोबर तपासले जात नसल्याचे लक्षात येताना दिसत आहे. “दैनिक तापमान रेकॉर्ड करण्यासाठी चार पारा-आधारित थर्मामीटर वापरतात. सध्याच्या तापमानासाठी कोरड्या मर्क्युरी बल्बचा वापर केला जातो आणि आर्द्रता तपासण्यासाठी ओला बल्ब वापरला जातो. तापमान क्षेत्र बंद आहे आणि त्यातून फक्त हवा जाते,” साहू म्हणाले.
आणखी वाचा -
कर्नाटक सेक्स व्हिडिओ टेप कांड: प्रज्वल रेवन्नाला अटक करून आज कोर्टात केले जाणार हजर, इतर माहिती घ्या जाणून
'मला काही झाले तर दुःखी होऊ नका...' दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा भावनिक मेसेज व्हायरल