Monsoon 2025 : यंदाच्या मान्सूनमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पूरस्थितीचा इशारा

Published : May 24, 2025, 08:56 AM IST
maharashtra monsoon

सार

Monsoon 2025 : सध्या देशातील बहुतांश ठिकाणी मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. यामुळे अनेकांच्या शेतीचे, घराचे फार मोठे नुकसान झाले आहे. अशातच, यंदा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पुरपरिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. 

Monsoon 2025 Update : यंदाच्या मान्सूनपूर्व काळातच राज्यात पावसाचा जोर दिसून येतो आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 2025 चा मान्सून हंगाम राज्यात सरासरीच्या सुमारे 105 टक्के पावसासह पार पडणार आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये 110 ते 115 टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, संभाव्य पूरस्थितीचा इशाराही दिला आहे.

दिल्ली येथील हवामान विभागाच्या मुख्यालयाने एप्रिल महिन्यात हा अंदाज जाहीर केला होता. 15 एप्रिल रोजी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव आर. रविचंद्रन आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी महाराष्ट्रासाठी उपग्रह imagery च्या आधारे सादरीकरण करताना, या दोन भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता दर्शवली होती.

या अंदाजाला मे महिन्यापासूनच दुजोरा मिळाला आहे. कारण, मान्सूनपूर्व पावसात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सध्या 300 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे, जे अंदाजाच्या तुलनेत खूप जास्त आहे. प्रत्यक्ष मान्सून अजून दाखल व्हायचा असून, हवामान विभागाचा हा अंदाज मुख्यतः जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी होता. आता पुढील अद्ययावत अंदाज मे अखेरीस जाहीर केला जाणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

SSC–HSC Exam 2026: दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, डिजिटल मार्कशीटसाठी APAAR ID नोंदणी बंधनकारक
कौटुंबिक वाद टाळून जमीन-मालमत्तेची वाटणी कशी करावी? जाणून घ्या कायदेशीर हक्क आणि सोपे उपाय