Dombivli Fire : डोंबिवलीतील खोणी पलावामध्ये एस्ट्रोला टॉवरला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Published : Jan 13, 2024, 03:23 PM ISTUpdated : Jan 13, 2024, 06:06 PM IST
Pune Fire

सार

डोंबिवलीमधील खोणी पलावामध्ये असलेल्या एस्ट्रोला टॉवरला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

Dombivli Fire :  डोंबिवलीमधील एका टोलेजंग इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीतील खोणी पलावामधील (Khoni Palava) एस्ट्रोला टॉवरला आग लागल्याची माहिती देण्यात येत आहे. शॉर्ट सर्किटच्या कारणास्तव आग लागल्याचे सांगितले जात आहे.

इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली आणि वरच्या मजल्यापर्यत भडकली गेली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत नागरिक राहतात त्यांना इमारतीला आग लागल्यानंतर तातडीने बाहेर काढण्यात आले.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले जात आहे. अद्याप जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.

दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तैनात आहेत. याआधी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील चार मजली इमारतीला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. याशिवय तीन लोकांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना इमारतीमधून सुरक्षित बाहेर काढले होते.

आणखी वाचा : 

सोशल मीडियावरील पोस्ट Like करणे इंजिनिअर तरुणाला पडले महागात, गमावले 20 लाख रूपये

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग

Aurangabad Fire : औरंगाबाद येथील फॅक्टरीला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

PREV

Recommended Stories

SSC–HSC Exam 2026: दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, डिजिटल मार्कशीटसाठी APAAR ID नोंदणी बंधनकारक
कौटुंबिक वाद टाळून जमीन-मालमत्तेची वाटणी कशी करावी? जाणून घ्या कायदेशीर हक्क आणि सोपे उपाय