Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.
मुंबई: महाराष्ट्रावर पावसाचे संकट अधिक गडद झाले असून, हवामान विभागाने गुरुवार, 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तब्बल 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, तर काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
27
कोकण आणि मुंबई क्षेत्र
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व पावसाची शक्यता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज.
37
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाबरोबर वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होणार.
बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाचा अंदाज.
77
नागरिक व शेतकऱ्यांसाठी सूचना
राज्यात पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहू शकतो. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.