Amrit Bharat Express: दिवाळीनिमित्त रेल्वेकडून खास गिफ्ट! नागपूरसह महाराष्ट्रातून धावणार नवी ‘अमृत भारत एक्सप्रेस’, जाणून घ्या वेळापत्रक आणि थांबे

Published : Sep 25, 2025, 06:08 PM IST

Amrit Bharat Express: भारतीय रेल्वेने कमी उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी 'अमृत भारत एक्सप्रेस' ही नवीन ट्रेन सुरू केली. गुजरातच्या सुरतपासून ओडिशाच्या ब्रम्हपूरपर्यंत धावणारी ही ट्रेन महाराष्ट्रातील नागपूर, जळगाव, भुसावळसह अनेक स्थानकांवर थांबणारय. 

PREV
17
सामान्य प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

Amrit Bharat Express: भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा सामान्य प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी, जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देणारी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ आता महाराष्ट्रातून धावणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या नव्या ट्रेनमुळे महाराष्ट्रातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गुजरात ते ओडिशा या मार्गावर धावणारी ही ट्रेन केवळ आर्थिकदृष्ट्या परवडणारीच नाही, तर जलद कनेक्टिव्हिटी देणारी ठरणार आहे. 

27
ट्रेनचा संपूर्ण मार्ग

रेल्वे मंत्रालयाने ‘अमृत भारत एक्सप्रेस’ ट्रेन सुरतच्या उधना स्थानकातून ओडिशातील ब्रम्हपूरपर्यंत सुरु करण्याची घोषणा केली आहे.

या ट्रेनचा अंदाजे वेग प्रति तास 160 ते 180 किलोमीटर असेल.

महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर या गाडीचा थांबा असेल.

37
कोच रचना

प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीत एकूण 22 कोच असतील.

11 सामान्य श्रेणी

8 स्लीपर श्रेणी

1 पँट्री कार

2 लगेज-कम-ब्रेक व्हॅन

1 विशेष कोच दिव्यांग प्रवाशांसाठी

47
महाराष्ट्रातील थांबे

महाराष्ट्रातून नागपूरसह ही ट्रेन खालील स्थानकांवर थांबणार आहे.

नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव जंक्शन, भुसावळ जंक्शन, मलकापूर, अकोला जंक्शन, बडनेरा जंक्शन, वर्धा, नागपूर जंक्शन, गोंदिया जंक्शन. 

57
वेळापत्रक

सुरत (उधना) सुटणे: दर रविवारी सकाळी 07:10

ब्रहमपूर पोहोचणे: सोमवारी दुपारी 13:55

ब्रहमपूरहून सुटणे: सोमवारी रात्री 11:45

सुरत (उधना) परत: बुधवारी सकाळी 08:45 

67
प्रवाशांसाठी विशेष लाभ

मध्यमवर्गीय आणि नोकरदारांसाठी कमी दरात लांब पल्ल्याचा प्रवास सोयीस्कर.

सकस गती आणि थेट कनेक्टिव्हिटीमुळे वेळेची बचत.

सुट्ट्यांच्या हंगामात प्रवासासाठी स्वस्त व सोपा पर्याय. 

77
उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 27 सप्टेंबरला या नव्या ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. वंदे भारतनंतर आता ‘अमृत भारत’ एक्सप्रेसच्या माध्यमातून रेल्वे प्रवासाचे नवे पर्व सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories