Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांसाठी २८ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रांमुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई: हवामान विभागाने 28 ऑक्टोबरसाठी महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रांच्या प्रभावामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाची सक्रियता कायम राहणार आहे.
27
मुंबई-कोकण
मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी किंवा रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
कोकणातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट
37
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा आणि कोल्हापूरला यलो अलर्ट
सांगली व सोलापूरमध्ये हलका पाऊस
पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रात पावसाची सक्रियता
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वाढवणार आहेत.