Maharashtra Weather Alert: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होणारय. हवामान खात्याने २४ ऑक्टोबरला २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यताय.
मुंबई: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाची जोरदार पुनरागमनाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
27
मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर
मुंबई शहर व उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणासह संध्याकाळी ते रात्रीपर्यंत मध्यम पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
मुंबईचे कमाल तापमान सुमारे 36°C, तर किमान तापमान 25°C इतके राहील. कोकणातील सर्व जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.
37
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता वाढणार आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये 24 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता, तर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे.
नाशिक, नंदुरबार, धुळे आणि अहिल्यानगर (नगर) या जिल्ह्यांना हवामान विभागाने 24 ऑक्टोबरसाठी यलो अलर्ट दिला आहे. जळगाव वगळता उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत 25 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
57
मराठवाडा सज्ज
मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांसाठी 24 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट लागू राहणार आहे. 25 ऑक्टोबरला परभणी, हिंगोली आणि नांदेड वगळता उर्वरित पाच जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
67
विदर्भातही पावसाचा जोर कायम
बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 24 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला असून, 25 ऑक्टोबर रोजीही अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
77
राज्यभरात हवामान बदलणार
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रात 27 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे.