Maharashtra Talathi Bharti 2025 : सुवर्णसंधी! राज्यात 1700 तलाठी पदांची भरती, अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू

Published : Oct 23, 2025, 03:42 PM IST

Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र महसूल विभागातर्फे लवकरच 1700 तलाठी पदांसह एकूण 4,644 पदांची भरती प्रक्रिया सुरू होणारय. ही भरती प्रक्रिया डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होण्याची शक्यता असून पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची मोठी संधी आहे.

PREV
17
राज्यात 1700 तलाठी पदांची भरती

मुंबई: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर! महाराष्ट्र महसूल विभागाकडून तब्बल 1700 तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली असून ही भरती राज्यातील तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी ठरणार आहे. 

27
एकूण 4,644 पदांवर राज्यभर भरती

या तलाठी भरतीसह महसूल विभागात एकूण 4,644 पदे भरण्याची योजना आहे. ही पदे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये विभागली जाणार आहेत. अधिकृत अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, आगामी काही महिन्यांतच तरुणांना महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यात नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. 

37
तलाठी पदांचे महत्त्व आणि गरज

तलाठी हे पद ग्रामीण भागातील महसूल व्यवस्थापन आणि जमीन नोंदींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने ही भरती महत्वाची आणि गरजेची मानली जात आहे.

ही पदे ग्रुप-सी वर्गात मोडतात आणि महाराष्ट्रातील सहा महसूल विभागांमध्ये

मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर पदांचे वाटप केले जाईल. 

47
पात्रता आणि वयोमर्यादा

उमेदवार पदवीधर असावा.

MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र आवश्यक.

वयमर्यादा 18 ते 38 वर्षे, आरक्षणानुसार सवलत लागू.

परीक्षा स्वरूप : कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)

विषय : मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी 

57
एकूण गुण वाटप

मराठी – 25 गुण

इंग्रजी – 25 गुण

सामान्य ज्ञान – 40 गुण

बुद्धिमत्ता – 10 गुण

चुकीच्या उत्तरांवर 1/4 गुण वजा केले जातील. 

67
भरती प्रक्रिया कशी असेल?

अधिकृत भरती अधिसूचना mahabhumi.gov.in

या संकेतस्थळावर डिसेंबर 2025 पर्यंत प्रसिद्ध होईल.

अर्ज प्रक्रिया सप्टेंबर ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत सुरू राहण्याची शक्यता आहे.

अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील.

अर्ज शुल्क : ₹350 ते ₹500 (वर्गानुसार)

परीक्षा TCS मार्फत CBT पद्धतीने होईल (कालावधी – 2 तास).

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा + कागदपत्र तपासणी

महसूल सेवकांसाठी राखीव जागा ठेवण्याचा विचार असून, त्यांच्या अनुभवानुसार अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत. 

77
तरुणांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी ही तलाठी भरती एक सुवर्णसंधी ठरणार आहे. ग्रामीण भागात काम करण्याची आवड असलेल्या आणि स्थिर सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांनी ही संधी कुठल्याही परिस्थितीत गमवू नये. अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया त्वरित सुरू होणार असल्याने उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे तयार ठेवावीत.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories