मराठवाडा: बहुतांश भागात हवामान कोरडे असले तरी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावू शकतो.
पश्चिम महाराष्ट्र: या भागात उष्णतेची लाट जाणवेल, मात्र सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
कोकण किनारपट्टी: मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता कमी असली तरी हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाडा जाणवेल. येथे कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र: खान्देश आणि परिसरात हवामान पूर्णपणे कोरडे राहील. मात्र, कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उन्हाचा चटका अधिक तीव्र असेल.